Dr. Rohini Kulkarni – Pandhre, Principal

      rohini-pandhre

 
 
शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय हे शेक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाची स्थापना १९२३ साली झाली असून मराठवड्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे या महाविद्यालयाने प्रथम खुली केली.

मराठवाडा मुक्तिसंग्रामसाठी प्रेरणादायी ठरलेल्या ‘वंदेमातरम’ चळवळीची मुहूर्तवेळ याच महाविद्यालयातील स्वातंत्र्यप्रेमी विद्यार्थ्यानी शेवत्याचा तेजस्वी इतिहास या महाविद्यालयाला लाभला आहे. अतिशय रम्य निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या परिसरात या महाविद्यालयाच्या एतिहासिक आणि नवीन वास्तु इतिहास आणि परंपरेची साक्ष देत आहेत.

या महाविद्यालयाने घडवलेले अनेक नामवंत अनेकविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहे.

राजकारण, समाजकारण, साहित्य सांस्कृतीक क्षेत्रात स्वताचा अमीट ठसा आमच्या विद्यार्थ्यानी उमटविला आहे आणि उमटवित आहेत. मा. राजभान जाधव ते मा. विक्रम काळे. ही राजकारणातील मोठी नावे आहेत. भगवंत देशमुख, बाळकृष्ण कवठेकर, प्रशांत दळवी ही लेखन क्षेत्रातील नावाजलेली नावे याच महाविद्यालयाशी जोडलेली आहेत. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात डॉ. कमलाकर सोनटक्के, डॉ. लक्ष्मण देशपांडे, श्री. चंद्रकांत कुलकर्णी, श्री. भगवान काळे, अविनाश भोसले, राहुल ढोले, प्रतीक्षा लोणकर – दळवी, शुभांगी संगवई – गोखले, प्रतिभा लोणकर ही नवी जुनी नावे कला क्षेत्रातील नावाजलेली मंडळी आहेत.

याशिवाय प्रशासकीय अधिकारी, संशोधक, खाजगी उद्योगक्षेत्रात उच्चपदस्थ, डॉक्टर, प्राध्यापक, वकील अश्या सर्व पदांवर आमचे विद्यार्थी महाविद्यालयाचा मान वाढवत आहेत.

या महाविद्यालयात असलेले अभ्यासू, तज्ञ, कार्यक्षम आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त प्राध्यापक वर्ग ही आमची जमेची बाजू आहे.

महाविद्यालयास प्रशस्त वर्गखोल्या आणि सुसज्ज प्रयोगशाळा, मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, अद्यावत सभागृह, भव्य क्रीडांगण असून येणार्यान प्रत्येक प्रचार्यांेनी या महाविद्यालयाला उत्तमोतम सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून अभ्यासपूरक व इतर पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथालयाची स्वतंत्र, अत्याधुनिक इमारत क्षेत्रफळावर ज्ञानपिपासूत्री तृष्णा भागवत आहे.

या महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेचे एकूण २२ विभाग कार्यरत असून भूगोल, संगीत, गृहविज्ञान विभागात पदव्युतर क्षिक्षणाची सोय आहे. इंग्रजी माध्यमातून कला शाखेचे शिक्षण देणारे हे मराठवाड्यातील एकमेव महाविद्यालय आहे. दरवर्षी गुणवत्ता यादीत आमचे विद्यार्धीच आहे. दरवर्षी गुणवत्ता यादीत आमचे विद्यार्धी निच्छितपणे झळकतात.

काही आमच्या माजी विद्यार्थ्यानी सुरू केलेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रभरातील वाक्कपटूंना सहभागासाठी मनाची वाटते.